Ad will apear here
Next
सोलापूर ‘मसाप’तर्फे साहित्यिकांशी वार्तालाप कार्यक्रम
सोलापूर : मराठी साहित्य परिषदेच्या (मसाप) येथील शाखेमार्फत मसाप शाखाप्रमुख आणि साहित्यिकांशी वार्तालाप व लेखक-वाचक संवादाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम २१ ऑगस्टला सायंकाळी निर्मलकुमार फडकुले सभागृहात झाला.

या वेळी सुहास पुजारी, योगिराज वाघमारे, ल. सि. जाधव, डॉ. श्रुती वडगबाळकर, मारुती कटकधोंड, राजेंद्र भोसले, बदीउज्जमा बिराजदार, गिरीश दुनाखे आदी उपस्थित होते. डॉ. किशोर सानप यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करून आपली भूमिका स्पष्ट केली.

लक्ष्मीनारायण बोल्ली, डॉ. गो मा. पवार, माई पवार यांच्या निवासस्थानी जाऊन डॉ. किशोर सानप, प्राचार्य कविता सानप, राजेंद्र भोसले यांनी सदिच्छा भेट घेतली. २२ ऑगस्टला लातूरच्या दयानंद महाविद्यालयात डॉ. किशोर सानप यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर दुपारी डॉ. नानासाहेब सूर्यवंशी यांच्या लोहा महाविद्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. सायंकाळी सहा वाजता नांदेड येथे निर्मलकुमार सूर्यवंशी यांच्या कार्यालयात लेखकांशी वार्तालाप कार्यक्रम झाला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WYYCBF
Similar Posts
मोबाइल ॲपद्वारे होणार पशुधनाच्या नोंदी मुंबई : राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये एक हजार २८४ राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून आठ लाख ५५ हजार ५१३ पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये
पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ञांचे मार्गदर्शन सोलापूर : ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी येथील ड्रीम फाउंडेशनचे व्यवस्थापक काशिनाथ भतगुणकी यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी,
सृजनरंग नियतकालिक स्पर्धेत ‘ऑर्किड ऑरा’ सर्वप्रथम सोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या सृजनरंग व्यावसायिक नियतकालिक स्पर्धेत एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘ऑर्किड ऑरा २०१७’ला सर्वोत्कृष्ट नियतकालिक म्हणून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांमधील लेखक चिरंतन रहावा, यासाठी महाविद्यालय
पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडाचे दोन हजार कोटी पंढरपूर : ‘शहराच्या विकासासाठी कॅनडा सरकारने आर्थिक साह्य करण्याची घोषणा केली आहे. कॅनडा सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे,’ अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली. भारत आणि कॅनडा सरकारच्या मैत्रीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परदेशी शहराच्या धर्तीवर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language